भाजप आमदाराने संचारबंदी आणि जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केला !

Smiley face < 1 min

ई ग्राम : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानां लोक प्रतीनिधी सर्रास कायद्याचे उल्लंघन करताना राज्यात दिसत आहे. सामान्य माणसाला बाहेर पडायला मुश्किल असताना पोलीस गरीब जनेतला फटके मारत असून मोठ्या लोकांचे लांगूलचालणं करताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून वारंवार केले जात आहे. पण पतप्रंधानाच्या आवाहनाला त्याच्याच पक्षातील नेते मंडळी खोडा घालताना दिसत आहेत. भाजपचे आर्वी येथील आमदार दादाराव केचे यांनी संचारबंदी आणि जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्यानं सर्वच स्तरातून यावर टीका होत आहे. याशिवाय संचारबंदीचा कायदा फक्त सामान्य माणसांसाठी आहे काय ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडत आहे.

वाचा  आता ५ मिनिटांत होणार कोरोनाची 'रॅपिड टेस्ट'

भाजप आमदार केचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इव्हेंट प्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित केलं. यासाठी रिक्षा फिरवून धान्य वाटपाचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर धान्य वाटपच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भंग करण्यात आला. केचे यांच्या घरासमोर जमलेली गर्दी एखाद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमवलेल्या लोकांप्रमाणे भासत होती. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य आहे की नाही, असाच प्रश्न जाणकारांकडून विचारला जात आहे. आपण राज्यात पाहत आहोत कि जे डॉक्टरस, पोलीस , मिलिटरी कर्मचारी यांनासुद्धा कोरोनाची बाधा होत आहे. अशी परस्थिती असताना लोकांना एकत्र करणे हे कितपत बरोबर आहे ?

वाचा  कोरोना : पोल्ट्रीवरील संकट व उपाययोजना

लोकांना मदत मिळवी त्याला कोणाचीच ना नाही पण ठरवून दिलेले नियम अशा कठीण प्रसंगी आमलात आणावेत, नसेल जमत तर या प्रकारचा पब्लिसिटी स्टंट लोकांनाच नव्हे तर आयोजकांना सुद्दा महागात पडू शकतो. जगातील मोठ मोठे नेते , राजे-महाराजे याना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून हे लोक गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहेत. या उलट आपल्याकडची अर्धवट शिकलेले लोकप्रतिनिधी लोकांना एकत्र करत आहे. अन्नधान्य वाटपासाठी घरपोच सेवेचा पर्याय सुद्धा असतो हे कदाचित नेते मंडळी विसरत आहेत. भारतातील गरिबीमुळे आपला देश कोरोनाशी मुकाबला करण्यास सज्ज नाही असे निष्कर्ष जगातील मोठंमोठ्या तज्ज्ञांनी दिले आहेत. अशा वेळी आमदार-खासदार आणि लोक प्रतिनिधींनी यांनी प्रसंगाचे भान ठेवून काम करण्याची गरज आहे. अन्यथा मदत होयची दोन दिवसांची अन जीव जायचा कायमचा.

वाचा  ट्रम्प म्हणतात तुमचे उपकार विसरणार नाही; मोदींनी दिले 'हे' प्रत्युत्तर
Download App