केंद्र सरकारने केली ८० हजार टन हरभऱ्याची आयात, बाजारपेठेमध्ये मंदी.

Smiley face < 1 min

ई-ग्राम: चालू आर्थिक वर्षांत नोव्हेंबरअखेरपर्यंत उपलब्ध माहितीनुसार 79.8 हजार टन हरभऱ्याची आयात झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल-नोव्हेंबर कालावधीच्या तुलनेत 377 टक्क्यांनी वाढ आहे. दुसरीकडे, काबूली हरभऱ्याची आयातीत 130 टक्क्यांची वाढ दिसतेय. 1.65 लाख टनापर्यंत काबूली हरभऱ्याची आवक वाढली आहे. हरभऱ्याचा स्पर्धक असलेल्या वाटाण्याच्या आयातीत मात्र तुलनेने कमी वाढ आहे. एकूण आयात 6.1 लाख टन असून, 25 टक्क्यांची वाढ आहे. एकूण कडधान्यांची आयात 23 लाख टनावर पोचली असून, 45.9 टक्क्यांनी वाढ आहे.

वाचा  कर्जमुक्ती योजनेसंबंधी लाभार्थींच्या यादीची प्रतीक्षा


आयात हरभरा डाळी, या वर्षी जास्तीच्या क्षेत्रामध्ये झालेली हरभऱ्याची लागवड आणि केंद्र शासना कडे असलेल्या गेल्या वर्षीचा कोटा या मुळे हरभऱ्याच्या बाजारभावात आणि वायदे बाजारात घट होताना दिसत आहे.
खरीप कडधान्यांच्या उत्पादनात उदिष्टाच्या तुलनेत लक्षणीय घट असल्यामुळे तूर, मसूरसह वाटाणा आयातीचा कोटा वाढवून देण्याची मागणी भारतीय प्रोसेसर्सकडून होत आहे. वाटाण्याची आय़ात वाढली तर त्याने हरभरा बाजारभावाला स्पर्धा निर्माण होते. आयातीत वाटाणा तुलनेने हरभऱ्यापेक्षा स्वस्त असतो. इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने कडधान्य आयात कोट्यात सहा लाख टनाने वाढ करावी. त्यात उडिद, तूर, वाटण्याचा प्रत्येकी दोन लाख टन वर्गवारी असावी, अशी मागणी पुढे येतेय.

वाचा  कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

जास्तीची लागवड, केंद्राकडील शिल्लक साठा आणि आयात हरभऱ्यामुळे स्थानिक बाजारपेठमध्ये आणि वायदे बाजारात मंदीचे चित्र आहे. हरभरा उत्पादकांची डोकेधुकी वाढणार असल्याचे चित्र जेष्ठ बाजारभाव विश्लेषक व्यक्त करत आहे.

Download App