कोरोना उठला ‘चिकन’च्या मुळावर

Smiley face < 1 min

ई ग्राम। राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहे. विशेषत: कुक्कुटपालन उद्योगाशी संलग्न मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. तसेच कुक्कुटव्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल कोरोना विषाणू’ प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. आपल्याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे मांस व उत्पादने आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित असुन नागरीकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

वाचा  कोरोनाच्या संकटातही पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा

महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे.२०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामधे एकूण कुक्कट संख्या ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. चीन या देशामध्ये आलेल्या ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भाव अनुषगांने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादन यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत.

वाचा  शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संकलन केंद्रांवरून होणार आता थेट ‘ई-नाम’ अंतर्गत व्यापार

‘नोव्हेला कोरोना विषाणू’ हा सांसर्गिक असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित होतो. तथापि कुक्कुट पक्षामधील कोरोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. मांस व उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये ‘नोव्हेल कोरोना विषाणू’ संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. तरी ग्राहकांनी सोशल मीडिया, फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेल्या माहिती, बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याकडील कुक्कुट मांस व उत्पादने यांचा ‘नोव्हेल कोरोना विषाणू’शी संबध नाही. ती आहारात वापरण्यासाठी पुर्णतः सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. परिहार यांनी सांगितले आहे.

वाचा  जाणून घ्या, तंदुरूस्त झालेल्या व्यक्तीपासून किती दिवस 'अंतर' ठेवावं
Download App