पावसामुळे पिकांचे नुकसान

Smiley face < 1 min

औरंगाबाद : मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने शनिवारी (दि.29)  रोजी सायंकाळी आणि रविवारी (दि.1) रोजी पहाटे दणका दिला. या पावसाबरोबरच आलेल्या पावसाने काढणीला आलेली, सोंगून ठेवलेली पिकं भिजली तर पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभी पिक आडवी झाली. यामध्ये मका आणि गहू पिकाचं मोठ नुकसान झाल्याचं चित्र आहे. फळपिक व आंबा मोहरालाही या वादळी पावसाचा दणका बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 मार्चला मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज होता. शुक्रवारपासूनच वातावरणातील बदलांनी त्याचे संकेत दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात शुक्रवारी (दि.28)  रोजी रात्रीनंतर सुरू झालेल्या वाऱ्याच्या वेगाने अवकाळी पाऊस येण्याचे संकेत दिलेच होते. तसेच या वाऱ्यामुळे सोयगाव तालुक्‍यातील डोंगरालगतच्या भागातील काही पिकं आडवी केली होती. त्यामध्ये शनिवारी सायंकाळनंतर आलेल्या जोरदार वादळासह पावसामुळे भर पडली. काढणीला आलेला गहू व तुऱ्यावरील मकाचे पिक आडवे झाले.

वाचा  निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; कृषीमंत्र्यांकडे तक्रार दाखल

वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणचे ज्वारीचे पिक आडवे झाले. काढणी केलेल्या हरभरा आणि गव्हाचे ढिगारे भिजले. उस्मानाबाद शहर परिसरात रविवारी (दि.1) पहाटे दिडच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरूवात झाली. जवळपास अर्धा तास हा पाउस झाला. येडशी, तेर भागात पावसाचं प्रमाण होत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या बेलकुंड, मातोळा मंडळात रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिक भिजली. ज्वारीच्या कणसात पाणी गेल्याने ती काळी पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वाचा  शिवसेनेच्यावतीने औरंगाबाद येथे पीक-पाणी परिषदेचे आयोजन

आधी खरीपात मोठ्या प्रमाणात अवेळी पावसाने केलेल्या नुकसानीनंतर आता रब्बीतील मका या महत्वाच्या पिकावरही नैसर्गीक संकट ओढावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नोंदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 0.63 मिलीमिटर, 1.23 मिलीमीटर, बीड 1.24 मिलीमिटर, लातूर 0.43 मिलीमिटर तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 1.39 मिलीमिटर पावसाची पावसाची नोंद घेतली गेली. प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी 23, बीड जिल्ह्यातील 26 तर लातूर जिल्ह्यातील 16 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 19 मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वाचा  ज्वारीचे २५० एकरातील पीक फस्त, शेतकऱ्यांवर संकट
Download App