वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी गोर गरिबांना जीवनश्यक वस्तूंचे वाटप

Smiley face < 1 min

ई ग्राम : संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून सरकारने देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे, यामुळे गोर गरीब बांधवांचे अतोनात हाल होत आहेत याची दखल घेत सरपंच दीपाली कोकरे यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन करून त्यांच्या मार्फत गोर गरिबांना धान्यसह जीवनश्यक वस्तू मिळवून देण्यात मोलाची मदत केली.

मुळशी तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील गोर गरीब आदिवासी व गरजू बांधवाना निशाद जोगदांड, मित्र परिवार व हरी दम्मलापती व सुरज चक्रवर्ती मित्र परिवार यांच्या वतीने कडधान्यंसह जीवनश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, ग्रामपंचायत हद्दीतील गोठे आदिवासी वस्ती, भोरकस आदिवासीवस्ती, आणि ऐनडी आदिवासी वस्ती येथील आदिवासी गोर गरीब व गरजू बांधवाना कडधान्यसह जीवनश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

वाचा  अवैध सावकारांची होणार चौकशी

तसेच ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक गावात जंतुनाशक फवारणी करून सॅनिटायझर,मास्क आणि डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. वांद्रे ग्रामपंचायतने या काळात तातडीची बैठक लावून पाच सदस्यांची सुरक्षा समिती नेमून प्रत्येक गावात एक सदस्य व चार ग्रामस्थांची गाव समितीची नेमणूक केली असून त्या भागातील येणाऱ्या नागरिकांना घराबाहेर न पडता त्या गावसमिती मार्फत आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतने केला आहे.

वाचा  कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार

ग्रामस्थांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक गावात गाडी फिरवून आवाहनही करण्यात येत आहे, वांद्रे ग्रामपंचायत हद्दीत वांद्रे, भोरकस, वडूस्टे, लिंबारवाडी,पिंपरी, आहिरवाडी, गोठे सुसाळे, हिरडी, या नऊ गावात स्वच्छता करून औषध फवारणी केली तर ग्रामस्थांची योग्यती काळजी घ्यावी यासाठी ग्रामपंचायत विषेश प्रयत्न करीत आहेत. यावेळी वांद्रे ग्रामपंचायतच्या सरपंच दीपाली विनायक कोकरे, उपसरपंच शरद जानकर, सदस्य विष्णू शिंदे, सुमन सुमन खराडे, मीरा वालंज, विशाल पडवळ, एकनाथ हिलंम, ताराबाई माळी, प्रमिला ढमाले, जाई मरगले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात स्वच्छता करून औषध फवारणी केली आहे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे मात्र ग्रामस्थांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे

दिपाली कोकरे सरपंच- ग्रामपंचायत वांद्रे
Download App