‘या’ कारणामुळे कांद्याला ‘अच्छे दिन’

Smiley face 2 min

ई ग्राम : भारताने कांदा निर्यातबंदी उठविल्याची अधिसूचना जारी केल्याची माहिती जागतिक बाजारपेठेत धडकताच सिंगापूर, मलेशिया, दुबई, कुवेत, ओमान, मस्कतमधून १५ मार्चनंतर भाव काय राहतील इथंपासून ते किती कांदा उपलब्ध होईल इथपर्यंतची चौकशी निर्यातदारांकडे सुरू झाली, तसेच कांदा उत्पादक पट्ट्यात बाजारभावातील घसरण थांबून क्विंटलमागे सरासरी शंभर रुपयांनी वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला दीड लाख क्विंटलपर्यंत आवक होणाऱ्या कांद्याची पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत विक्री सुरू राहील. याच आसपास उन्हाळ कांद्याची आवक वाढण्यास सुरवात होईल. त्यामुळे निर्यातदारांचा पुण्यातील उन्हाळ कांदा संपल्यानंतर नाशिकच्या कांद्याकडे कल वाढण्यास सुरवात होणार आहे. एप्रिल आणि मेमध्ये शेतकरी व व्यापारी उन्हाळ कांद्याची साठवणूक करण्यास सुरवात करतात. ही सारी परिस्थिती पाहता, जिल्ह्यातून निर्यातीसाठी १५ ते १६ रुपये किलो भावाने कांदा उपलब्ध होईल आणि मागणीएवढा कांदा पाठविण्यात येईल, असे निर्यातदारांनी चौकशी करणाऱ्या आयातदार व्यापाऱ्यांना सांगितले.

वाचा  पंधरा दिवसांच्या विलंबामुळे शेतकरी नाराज

उन्हाळ कांद्याची आवक कमी
लाल कांद्यासोबत जिल्ह्यातील बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. उन्हाळ कांद्याची आवक कमी असून, त्यास साधारणत: लाल कांद्याच्या आसपास भाव मिळत आहे. उन्हाळ कांद्याला क्विंटलला पिंपळगावमध्ये एक हजार ७५१, तर कळवणमध्ये एक हजार ७७५ रुपये भाव मिळाला. सद्यःस्थितीत पुणे भागात उन्हाळ कांद्याची आवक चांगली असल्याने लाल कांद्याच्या जोडीला पुण्यातील उन्हाळ कांद्याच्या खरेदीकडे निर्यातदारांचा सुरवातीला कल राहणार आहे. पुण्यात उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा भाव बाराशे रुपये असा आहे.

वाचा  कांदा निर्यात बंदी : मोदी देशाला गरीब करत आहेत काय ?

४० हजार क्विंटलची उपलब्धता
कांद्याची जिल्ह्यातील आवक पाहता, निर्यातीसाठी दिवसाला ४० हजार क्विंटल कांदा उपलब्ध होईल, अशी स्थिती सध्याची आहे. होळीसाठी असलेली कांद्याची मागणी पूर्ण झालेली असल्याने निर्यातबंदी “जैसे थे’ राहिल्यास कांद्याचे किलोचे भाव दहा रुपयांपर्यंत गडगडण्याची चिन्हे भावाच्या घसरणीवरून दिसू लागली होती. अधिसूचना जारी झाल्याने ही स्थिती संपुष्टात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव कमी होऊ लागले आहेत. अंदरसूलला दोन हजार २०० आणि चेन्नईमध्ये अडीच हजार रुपये क्विंटल अशा स्थिर राहिलेल्या भावाचा अपवाद वगळता इतरत्र भाव कमी झाले आहेत. चोवीस तासांत कानपूरमध्ये दीडशेने भाव कमी होऊन एक हजार ९५०, कोलकत्यामध्ये ५६३ रुपयांनी भाव कमी होऊन दोन हजार ३७५, पाटण्यामध्ये १२० रुपयांनी भाव कमी होऊन दोन हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. दिल्लीमध्ये क्विंटलभर कांद्याचा घाऊक भाव दोन हजार रुपयांच्या आत आहे.

वाचा  आयात कांद्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव रुपयांमध्ये
मुंबई- एक हजार सातशे पन्नास
कोल्हापूर- एक हजार चारशे
पंढरपूर- एक हजार देानशे पन्नास
नागपूर- दोन हजार पंचवीस
सांगली- एक हजार ती

Download App