इ ग्राम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून होणाऱ्या वस्तूसह खुल्या बाजारात विक्री होणाऱ्या इतर वस्तूंच्या विक्रीस परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. यामध्ये तांदळाचे ११ जाती (बासमती, कोलम तांदूळ ) शेंगदाणे आणि डाळी, कडधान्य यांच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. यासंबधीचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्द झाला असून अधिक माहितीसाठी पुढील जीआर पहा..
आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे दूरगामी परिणाम होणार असून बासमती तांदूळ प्रथमच सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर शेंगदाणे, डाळी आणि कडधान्य असा प्रोटिन्सयुक्त आहार कमी दरामध्ये सामान्य माणसाला भेटू शकेल असं प्रथम दर्शनी दिसत आहे. महानंद आणि आरे या शासनाच्या डेअरीचे प्रॉडक्ट सुद्धा सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित करण्यात येणार आहेत. सद्या देशात डाळीचे उचांकी उत्पादन होत असल्याने शेतकऱ्याने याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे चित्र आहे. यामधून डोमेस्टिक डिमांड वाढनार असल्याने हरभरा, तूर याचे बाजारभाव वाजवी भेटण्याची आशा निर्माण होणार आहे.
