ई ग्राम : महानंद दुग्धशाळेच्या अधिकृत वितरकांमार्फत मुंबई/ठाणे तसेच, राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण करण्यात येईल. संबधीत रास्तभाव दुकानदारांनी महानंद दुग्ध शाळेच्या संबंधित वितरकांशी परस्पर संपर्क साधणे आवश्यक राहील. यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.
महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेत उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे बॅण्डचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव/शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेच्या तसेच, आरे बँडच्या योजनेप्रमाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी संबंधित रास्तभाव दुकानदारांनी संबंधित योजनेच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधणे आवश्यक राहील. हा व्यवहार महाराष्ट्र राज्यातील शासकीय दुग्धशाळा तसेच आरे बँड व संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्यामध्ये राहील. यात कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.
