ग्रामपंचायतीचा करवसुलीचा टक्‍का निम्माच

Smiley face 2 min

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या ग्रामपंचायतीकडून विकासकार्य अविरत सुरू राहण्यासाठी पाणीपट्‌टी आणि घरपट्‌टीकरासह इतर कराची वसूली अपेक्षीत असते. यंदा या वसूलीत प्रत्यक्षात निम्मच यश जिल्हा परिषद प्रशासनाला मिळालं आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद पंचायत विभागाने नुकतीच विशेष मोहीम राबवून करवसुलीचा टक्‍का सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या नऊ तालुक्‍यांमधील ग्रामपंचायतीकडे पाणीपट्‌टीची मार्च २०१९ अखेर दोन कोटी ८४ लाख ६६ हजार रूपयांची करवसूली थकीत होती. २०१९-२० ची पाणीपट्‌टीची मागणी बारा कोटी ३४ लाख ३५ हजार मिळून पंधरा कोटी १९ लाख एक हजार रूपये यंदा वसूल होणे अपेक्षीत आहे.

वाचा  विकास कामांसाठी ग्रामपंचायतींनी स्वावलंबी व्हावे- पेरे

प्रत्यक्षात पाणीपट्‌टीच्या मार्च २०१९ अखेर थकबाकी असलेल्या रकमेपैकी एक कोटी ६७ लाख ७२ हजार रूपये वसूल झाले, तर २०१९-२० वर्षासाठी अपेक्षीत करवसूलीपैकी केवळ सहा कोटी ७ लाख २३ हजार रूपायांचीच रक्‍कम वसूल करणे शक्‍य झाले. अर्थात यंदा पाणीपट्‌टीची पंधरा कोटी १९ लाख एक हजार रूपयांची वसूली होणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात जानेवारी २०२० अखेरपर्यंत केवळ एक कोटी ७४ लाख ९५ हजार रूपायांचीच वसूल होणे शक्‍य झाले. जे अपेक्षेच्या केवळ ५१ टक्‍के आहे.

वाचा  एवढा पाऊस होऊनही बघा धरणांची काय परिस्थिती; वाचा

दुसरीकडे घरपट्‌टी, दिवाबत्ती, कारखाना व इतर करापोटी मार्च २०१९ अखेर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे पाच कोटी ४६ लाख रूपये करवसूली थकीत होती. या करापोटी यंदा अपेक्षीत बत्तीस कोटी १० लाख ८१ हजार रूपये मिळून सर्व ग्रामपंचायतीकडून सदोत्तीस कोटी ५७ लाख ४६ हजार रूपये करवसूली अपेक्षीत होती. परंतू थकबाकी असलेल्या रकमेपैकी केवळ चार कोटी २९ लाख २२ हजार तर चालू वसूलीपैकी सोळा कोटी ५६ लाख ५३ हजार रूपये मिळून केवळ वीस कोटी ८५ लाख ७५ हजार रूपयेच जानेवारी २०२० अखेर घरपट्‌टी व इतर कर वसूली करणे प्रशासनाला शक्‍य झाले जी अपेक्षेच्या केवळ ५५ टक्‍केच आहे. पाणीपट्‌टी व घरकर वसूली किमान ८० टक्‍के वसूल होणे अपेक्षीत असतांना केवळ एक्कावन ते पंचाव्वन टक्‍केच या दोन्ही कराची वसूली झाल्याने जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले.

वाचा  ग्रामपंचायतीतील अनियमिततेसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार

प्रशासनाच्यावतीने ६ मार्चला एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायतीकडून करवसूलीची विशेष मोहीमेत राबविण्यात आली. शिवाय या मोहीमेतून झालेल्या करवसूलीचा अहवाल ९ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Download App