हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी वरदान

Smiley face 2 min

ई ग्राम : हिरव्या पालेभाज्या जीवनावश्यक पौष्टिकतेने भरलेल्या आणि विविध चव आणि त्यांच्या गुणधर्मामुळे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वर्षभर मिळत असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या या आपल्या आरोग्यासाठी  वरदान आहे. कमी उष्मांक आणि मेद पण भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणारे तंतू, जीवनसत्वे, अत्यावश्यक फॅटी असिड्स, प्रथिने, क्षार दररोजच्या आहारातील महत्वाचा घटक आहे.

आरोग्यासाठी फायदे:
१. तंतू :
आहारात आपल्याला लागणारे विरघळणारे – solubleआणि न विरघळणारे – insoluble तंतू हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात.हे तंतू रक्तातील मेद आणि साखर  कमी करण्यास मदत करतात तसेच त्याच्या पाणी साठविण्याच्या क्षमतेमुळे मनुष्याची विष्ठा ही मऊ आणि शरीराच्या बाहेर निघण्यास मदत होत असते.
हिरव्या पालेभाज्यांमधील हे तंतू हृदयरोग, मधुमेह,मोठ्या आतड्याचा कर्करोग ह्यांना प्रतिरोधकाचे काम करतात. तसेच बद्धकोष्ठ, स्थूलता नियंत्रण करतात.

वाचा  ‘सेवा हमी’च्या अंमलबजावणीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन

२. प्रथिने:
आहारामधील दररोज समाविष्ट असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या या स्वस्त प्रथिनांचा घटक आहे.कारण वातावरणातील सूर्यप्रकाश, पाणी, ऑक्सिजन आणि नायट्रोजन चा उपलब्धतेमुळे त्यांच्यात अमिनो असिड्स चे सिन्थेसिस आणि साठवणूक होत असते.
स्नायूंचे बळकटीकरण तसेच शरीरातील पेशींचा विकास आणि दुरुस्ती प्रथिने करत असतात.

३. जीवसनसत्वे :
हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते. याव्यतिरिक्त फॉलीक असिड, जीवनसत्व क, इ, के ,अ हे असतात.
अँटीऑक्सिडंट हे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करत असतात. फॉलेट हे शरीराची वाढ आणि विकास व्यवस्थित करणे,गरोदरपणी बाळामध्ये व्यंग न होण्यासाठी आहारात असणे जरुरी असते.
पालकांमध्ये ‘अ’ जीवनसत्व हे भरपूर असते तर शेवगा पानांमध्ये फॉलेट हे भरपूर असते.

वाचा  अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

४. क्षार:
हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, झिंक, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. क्षार हे शरीराचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी तसेच शरीरात होणाऱ्या क्रिया योग्य ठेवण्यासाठी मदत करत असतात.
लोह हे स्त्रिया, लहानमुळे, पौंगड्यावस्थेतील मुली मुले यामधील अशक्तपणा -अनेमिया कमी करणे, होऊ न देणे, झिंक हे आतड्याचे काम व्यवस्थित होणे व प्रतिकार शक्ती काम करते. कॅल्शिअम हे हाडांसाठी आणि पेशींच्या आरोग्यासाठी, मॅग्नेशियम हे दातांचे आरोग्य, मज्जातंतू तसेच स्नायूसाठी उपयुक्त आहे.

वाचा  हरभऱ्याला कवडीमोल दर; हमीभावापेक्षाही कमी भाव

५. अत्यावश्यक फॅटी असिड्स:
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अल्फा लिनॉलेनिक असिड ( precursor of omega 3 fatty acids) असते.ओमेगा 3फॅटी असिड्स चा उपयोग शरीराची वाढ व विकास तसेच हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग, संधिवात इतर आजारांसाठी होतो.

याव्यतिरिक्त चिघळ-चिऊ भाजी, तांदुळजा, चवलाई, लाल पोकळा, आंबूशी, लसणाची पात, मोरशेंड, गोठण वेलीचे लाल कोंब, भारंगीच्या कोवळ्या फांद्या, बांबूचे कोंब, चवळी शेंगा कोंब, हळदीचे पान या भरपूर स्थानिक हिरव्यापालेभाज्या असतात. महाराष्ट्रामधील बारीपाडा मधील रानभाजी महोत्सव खूप प्रसिद्ध आहे.
अर्चना ठोंबरे

Download App