राज्यात आज कोरोना बाधित ४७ नवीन रुग्णांची नोंद-आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात आज कोरोना बाधित ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील रुग्ण मुंबई २८, ठाणे परिसर १५, अमरावती ०१, पिंपरी चिंचवड ०१, पुणे ०२ असा रुग्णांचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ५३७ झाली आहे. यातील आतापर्यंत ५० सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे. देशातील सर्वच भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

वाचा  स्थानिक प्रशासनाकडून गावातील नागरिकांना मदतीचा हात

प्रशासन कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून आवश्यक ते वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. लॉकडाऊन वरच राज्य सरकार थाम्बणार नसून जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी आज दररोजच्या ब्रीफिंग मध्ये दिली. राज्य सरकार थ्री टी प्रिंसिपल वर काम करत असून ट्रेसिंग, टेस्टिंग, आणि ट्रीटमेंट मुळे यांचा नक्कीच फायदा राज्यातील जनतेला होणार. जनेंतने सहकार्य केल्या नंतर टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती आज राजेश तपे यांनी दिली.

वाचा  बाप रे! राज्यात ४ लाख ९० हजार कोरोना रुग्णांची शक्यता; पुण्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Download App