स्थानिक प्रशासनाकडून गावातील नागरिकांना मदतीचा हात

Smiley face < 1 min

ई ग्राम : सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाने हाहाकार घातला आहे. तोच कोरोना राज्यातील ग्रामीण भागापर्यत पोहचला आहे. त्याला रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून ही मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना ग्रामपंचायत शनि शिंगणापूर यांच्या वतीने स्‍व. भाऊसाहेब शेटे पाटील ग्रामसचिवालय यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

वाचा  अंत्यविधी, दशक्रियाकडे नातेवाईक, भावकीची पाठ

देश लॉकडाऊन केल्यामुळे भरपूर दुकाने बंद आहेत. मोठ्या प्रमाणात लहान मोठे उद्योग करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर वाईट वेळ आली आहे. तर ग्रामीण भागात मोलमजूरी करून कुटुंब चालवणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे शिंगणापूर गावातील २४ दिव्‍यांग व्‍यक्‍तींना जीवनावश्‍यक साखर, चहापावडर, रवा, तुप, पोहे, मठ, कोलगेट, व्‍हील साबन, संतुर साबन, मिठ, बिस्‍कीट, हळद, मिर्ची पावडर, गोडतेल व बेसन या वस्‍तुचे सोशल डिस्‍टंसिंग पाळुन वाटप करण्‍यात आले.

वाचा  स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना ‘ह्या’ सूचना

यावेळी शिंगणापूर पोलिस स्‍टेशनचे पो.निरीक्षक राजेंद्र चव्‍हाण, सरपंच बाळासाहेब बानकर, उपसरपंच अंबादास शेटे, ग्रामपंचायत सदस्‍य रामेश्‍वर भुतकर, बिबिशन शेटे, पोलिस पाटील सयाराम बनकर पाटील, तसेच ग्रामविकास अधिकारी दादासाहेब बोरुडे तसेच ग्रामपंचायतचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Download App