असे घेतले हळदीचे विक्रमी उत्पादन

Smiley face < 1 min

नवेखेड : वाळवा येथील प्रगतीशील योगेश चौगुले या शेतकऱ्यांने हळद उत्पादनात आपला हातखंडा निर्माण केला आहे. एका एकरात सरासरी ३८ ते ४० क्विंंटल उत्पन्न घेण्याचा त्यांनी विक्रम केला आहे.

योगेश हे महाविद्यालयीन शिक्षण घेताना वडिलांना शेती कामात मदत करू लागले. त्यातूनच त्यांना नगदी पिकांची आवड निर्माण झाली. त्यासाठी १० ते ११  महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. पहिल्यावर्षी त्यांना दोन एकरात  फक्त ३४  क्विंटल उत्पन्न मिळाले यामुळे ते नाराज झाले होते.

वाचा  महापरिक्षा पोर्टलला रामराम ; अशी होणार ७२ हजार पदांची भरती

अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने त्यांनी हळद लागवड बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चौगुले यांची तंत्र अधिकारी बिभीषण पाटील यांच्याशी भेट झाली. त्यावर त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी त्यांच्या चुका  सुधारल्या आणि नव्याने लागवड करण्यात सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांना अडीच एकरात ७६ क्विंटलचे उत्पन्न मिळाले. पुढे आणखी चुका सुधारल्या. आष्टा आणि परिसरात ते हुकमी हळद उत्पादक म्हणून चर्चेत आले. बाजार पेठेतील हळदीचे  बाजारभाव चढ-उतार राहिले. तरीही हळद लागवडीत त्यांनी सातत्य जोपासले.

वाचा  राज्यमंत्री तनपुरेंच्या गल्लीत बिबट्याचा फेरफटका

त्याबाबत बोलताना ते म्हणाले, “आमची जमीन निचऱ्याची आणि माळरानची आहे. जमिनीचे मशागत केल्यानंतर हळदीसाठी निवडलेल्या क्षेत्रात शेणखत विस्कटले जाते. त्यात हळद लागवड केली जाते. यासाठी चार फुटी सरीचा अवलंब केला जातो. हळदीमध्ये दरवर्षी आम्ही स्वीटकॉर्नचे आंतरपीक घेतो. एकरी दीड टनापर्यंत याचे उत्पादन मिळते. जनावरांना ओला चाराही उपलब्ध होतो. त्यातून हळदीचा काही प्रमाणात उत्पादन खर्च निघतो. अकरा महिने नंतर हळद काढणी होते.

वाचा  बागायतदारांसाठी वीजदर कमी करण्यासंदर्भात उपाययोजना- ऊर्जामंत्री

हळद लागवड आणि व्यवस्थापन या विषयी बोलताना ते म्हणाले,”आम्ही रासायनिक आणि सेंद्रिय अशी एकात्मिक पद्धत वापरतो, बेसल डोसवर भर दिला जातो. त्यासाठी निंबोळी पेंडचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हळदीचे कंद जास्तीत जास्त वरब्याच्या पोटात लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हळद चांगली पोसवते. पर्यायाने चांगले उत्पन्न मिळते.” 

Download App