देवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर सर्वात खुश मुनगंटीवार होतील : अजित पवार

Smiley face < 1 min

ई ग्राम, मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी पुस्तक लिहिले आहे. ते चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व 288 आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू. म्हणजे सुगीचे दिवस येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी जरा दिल्लीत बोलावे, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस हे दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटिवार अधिक खूष होतील, असा चिमटाही काढला.

वाचा  कारखानाने बंद असल्याने शेतकऱ्यांना फटका

माजी मुख्यमंत्री फडणवीस यानी लिहिलेल्या सोप्या भाषेत अर्थसंकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमती उद्भ ठाकरे, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोल, विधान परिषदेवे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह बहुसंख्य नेते उपस्थित होते.

अजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण केले. ते म्हणाले, “सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आजही आठवतोय. मी तेव्हा अर्थसंकल्प मांडत असताना तेव्हा भाजपची मंडळी गोंधळ घालत होते. त्या वेळी एक आमदार मात्र कानात स्पीकर ठेवून माझे भाषण शांतपणे ऐकत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्र फडणवीस होते.” अर्थमंत्र्यांचे भाषण शांतपणे ऐकावे, अशी टीप या पुस्तकाल लिहिली आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या मंडळींना टोला मारला.

वाचा  शेतकऱ्यांना सन्मान हवा !

फडणीवसांचा केंद्रीय अर्थमंत्रीपदावर नेम ? : दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदावर नेम ठेवला आहे कि काय अशी शंका सूत्र घेत असून मागेच ते भाषांनात म्हणाले होते कि राजकारणात फिल्डिन्ग करण्याचे दिवस आले कि मी पळून जातो. सद्या राज्यात भाजपची सत्ता गेली असल्याने आणि महाविकास आघाडी चे सुरळीत चालू आहे. ५ वर्ष्य परत येण्याची खात्री नसल्याने सत्तापदावर राहण्यासाठी फडणवीसांनी अर्थसंकल्पाची सोपी गोष्ट सांगितली नसेल ना ? फडणवीसांनंतर राज्य भाजप झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुधीर मुनगंटिवार हे योग्य असल्याने अजित पवारांनी वरील कोपरखळी मारलेली दिसत आहे.

वाचा  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अंदोलन
Download App