मोदींवर प्रेम करत असाल तर पाच मिनिट एका जागी स्तब्ध उभा राहा

Smiley face < 1 min

ई-ग्राम । “तुम्ही जर मोदींवर प्रेम करत असाल तर एका जागी स्तब्ध उभा राहून मोदींचा सन्मान करा अशा प्रकारचा उपक्रम काही लोकं चालवत आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे. मोदीला एखाद्या वेगळ्या वादात गुंतवण्यासाठी हे करत असतील किंवा खरंच त्यांच माझ्यावर प्रेम असेल. जर माझ्यावर प्रेम असेल तर हे करण्यापेक्षा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपेपर्यंत त्यांनी एका गरिब कुटुंबाची जबाबदारी घ्यावी”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली.

वाचा  ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

एका जागी पाच मिनिटं उभं राहून मोदींना सन्मानित करा अशी मोहीम सुरू असल्याचं माझ्या ध्यानात आणून दिलं आहे. याकडे पाहिलं तर सुरूवातीला मोदींना वादात ढकलण्यासाठी हे सुरू केलं आहे असं वाटतं. यामागे कोणाचा चांगला हेतूही असू शकतो. तर त्यांना माझीही एक विनंती आहे. जर कोणी मोदींना सन्मानित करू इच्छित आहे आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपेपर्यंत किमान एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासाठी यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नसेल, असं मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

वाचा  दूध प्रकल्प निर्मितीसाठी निधीचे नियोजन करावे - बच्चू कडू

सध्या देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७०० पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ५१९४ च्या वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

वाचा  जास्त दराने वस्तू विकणाऱ्यांवर पाेलिसांची धडक कारवाई
Download App