ई ग्राम : कोरोनासारख्या आजारातून आपण सगळेजण शिकतचं आहोत. हे संकट माणसांची मनं अलवार केल्याशिवाय राहणार नाही. हे संकट दुःखाची जाणीव दिल्याशिवाय राहणार नाही. आपली परंपरा ओढून घेण्याची नाही तर वाटून खाण्याची आपली संस्कृती आहे, असं सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ म्हणाल्या आहेत.
याबाबत त्या एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, ‘सध्या सगळ्यांनी सगळ्यांना सांभाळूण घेण्याचा काळ सुरु आहे. अडचणीच्या काळात मदत त्याच्याकडे संधी म्हणून बघतं आहे. त्यांनी संधी म्हणून बघू नका. सगळ्यांना मदत करायचे आवाहन सिंधुताईंनी केले.
पुढे त्या म्हणाल्या, ‘या संकटाच्या इतक्या ज्वाळा उठल्या आहेत तरीही लोक, जनता, लेकरं ही फिनिक्स भरारी घेतील याची मला खात्री मला आहे. हे संकट संपणार आहे. ही रात्र सरुन उद्याची स्वप्न आपण पाहणार आहोत,’ असं सकारात्मक भाष्य देखील त्यांनी केलं.
दरम्यान, माती, निती, आणि संस्कृती हातात घालून चालते त्याचं नाव महाराष्ट्र आहे. त्यामुळे एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ असे मत सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
