मुख्यमंत्र्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत नेत्यांची बैठक

Smiley face < 1 min

मुंबई : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करा, अशी शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सध्या राज्य विधीमंडळाच्या दोन्हीपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ६ महिन्यात कुठल्यातरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं बंधनकारक असतं.

विधान परिषदेत सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या २ जागा रिक्त आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी राज्यात सत्तापेच निर्माण झाला असता.

वाचा  ...म्हणून फडणवीस यांनी मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
कोरोनाचे संकट पाहता विधान परिषदेची निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Download App