ई ग्राम। दिवसेंदिवस कोरोनाचे विषाणू सर्वत्र पसरत आहेत. त्यामुळे या आजाराबद्द्दल नागरिकांच्या मनात भिती दिसून येत आहे. या भितीच्या वातावरणात नागरिकांनी खबरदारी घ्यायची गरज आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी नागरिकांनामध्ये कोरोना लागण झाल्याची भिती निर्माण होते आहे. त्यामुळे नेमका कोरोना आणि साधा ताप यातला फरक कसा ओळखायचा हे जाणून घेणे गरजेचं आहे. दोन्हीतला फरक काय ते समजून घेऊ.
सतत बदलत राहणाऱ्या वातवरणामुळे अनेक जण आजारी पडत असतात. त्यामुळे इन्फेक्शन तयार होत जाते. हे इन्फेक्शन लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यत कोणाला आजारी करू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. तर सामान्य तापाचे लक्षण- ताप आणि सर्दी, अंगदुखी, खोकला, त्वचेला खाज येणे, अन्नातून विषबाधा, केस गळणे अशी कारणे असू शकतात.
फरक असा ओळखा
भारतातील अनेक राज्यात कोरोनाने प्रवेश केला आहे. सर्दी, ताप आणि खोकला नागरिकांना भिती वाटते. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना ? अशी शंका मनात येते. यावर आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पण साधा तापाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. त्यामुळे साधा ताप हलक्यात घेऊ नये. श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर लवकरात लवकर तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कोरोना रोगप्रतिकारक क्षमता कमी करू शकतो. अफवांवर विश्वास न ठेवता योग्य काळजी घेतली तर कोरोनापासून दूर राहता येते.
