पपईला 14.55 रूपये प्रतिकिलोचा दर

Smiley face < 1 min

ई-ग्राम : शहादा, जि. नंदुरबार (प्रतिनिधी) : पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांच्यात पपई दरावरून सुरू असलेला वाद अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीने मिटला आहे. पपईला शिवार खरेदीत किंवा जागेवरच १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. यामुळे पपईची काढणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.

पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविला होता. त्यांनी दरवाढीला अर्ज सादर करून विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत पुन्हा बैठक घेतली त्यात १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर ठरवण्यात आला. यानंतर काढणी सुरू झाली.

वाचा  मार्केट ट्रेंड - हळद

बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इक्‍बाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते.

वाचा  संभाव्य उत्पादनवाढीमुळे हरभऱ्यात पडझड सुरूच

दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत दीर्घकाळ चर्चा चालली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाऱ्यांशी चर्चा करताना १६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी केली. यानंतर सभापती पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाऱ्यांना तिढा सोडवण्यास सांगितला. यातच काही शेतकऱ्यांनी पपईला प्रतिकिलो १६ रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तूर्त खरेदी वेगात सुरू असल्याचे सांगण्यात आले

वाचा  केंद्र सरकारने केली ८० हजार टन हरभऱ्याची आयात, बाजारपेठेमध्ये मंदी.
Download App