ट्रेंड : मक्यात नरमाई कल

Smiley face 2 min

ई ग्राम : अॅग्रोनव ई ग्राम मार्केट ट्रेंडमध्ये आपले स्वागत. आज आपण मका बाजारभावविषयक परिस्थिती जाणून घेणार आहोत….

चालू आठवड्यात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांत मक्याचे दर 1600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत नरमले आहेत. हंगामातील उच्चांकी 2100 रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवरून तब्बल पाचशे रुपयांची मंदी मक्यात आली आहे. “कोरोना व्हायसरच्या खोट्या पोस्ट्स प्रसूत झाल्यानंतर ब्रॉयसर्स आणि अंड्यांचे भाव उतरले, परिणामी पोल्ट्री उद्योगाकडील खप कमी होवून गेल्या दोन दिवसांत भाव घटले आहेत,” असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि,
“कोरोनाची धास्ती हे तत्कालिक कारण आहे. मक्यात संक्रांतीनंतर नरमाईचा कल सुरू झाला. पावसाळा लांबल्याने खरीप मक्याचे हार्वेस्टिंग उशिरा सुरू झाले. याच दरम्यान, रब्बी पेरणीसाठीही दिवस कमी होते. देशभरात डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत शेतकरी कामात व्यस्त होते. पुढे, संक्रांतीनंतर जस-जसे शेतकरी रब्बीच्या कामातून फ्री झाले, तशी मक्याची आवक वाढत गेली. परिणामी बाजारभावात नरमाईचा कल सुरू झाला.”

“महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट हे मक्याचे प्रमुख उत्पादक विभाग आहेत. उत्तर महाराष्ट्रात शेतकरी कांदा लागणी व्यस्त होता, तर मराठवाड्यातील शेतकरी कपाशीची काढणीमुळे वेळेत माल विकू शकले नाहीत. खासकरून, नाशिक जिल्ह्यात कांद्यातून चांगले पैसे मिळाल्यामुळेही मक्यातील होल्डिंग कॅपॅसिटी वाढली आहे. शिवाय, गेल्या हंगामात मक्याला 2500 रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी दर मिळाल्यानेही शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परिणामी, डिसेंबर व जानेवारी महिन्यात आवकेचा फ्लो मर्यादित होता.”

वाचा  महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील - अजित पवार

“2018 मध्ये दिवाळीनंतर ऐन आवक हंगामात तेजीचा कल सुरू झाला. लष्करी अळीमुळे दक्षिण भारतात तर दुष्काळामुळे महाराष्ट्रातील उत्पादन घटल्याने मक्यात ऐतिहासिक तेजीचा कल सुरू झाला. 2019 मध्ये नवी आवक सुरू होण्यापूर्वी मक्याचे भाव उच्चांकी 2500 रुपये प्रतिक्विंटलवर होते. 2018 मध्ये स्टॉकिस्ट लोकांना देखिल चांगला नफा झाला. अशाप्रकारे गेल्या हंगामातील तेजीच्या प्रभावामुळे चालू हंगामाच्या प्रारंभी देखिल स्टॉकिस्ट मोठ्याप्रमाणावर सक्रिय होते. स्टाकिस्ट खरेदी वाढल्यानेही ऐन आवक हंगामात बाजारात 1800 वरून 2100 रुपये प्रतिक्विंटल पोचला.”

वाचा  राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ४२३ वर

“मागील वर्षभर मक्याचे भाव उंच असल्याने भारतातून मक्याची निर्यात आठ वर्षांतील नीचांकी पातळीवर घटली. दुसरीकडे, युक्रेनसारख्या नॉन जीएमओ मका उत्पादक देशातून तुरळक प्रमाणात आयात देखिल सुरू झाली होती. यामुळेही स्टॉकिस्ट खरेदीला चेक बसला. “देशातील एकूण उत्पादनातील 90 टक्के मक्याची खरेदी ही पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून होते. महाग मक्यामुळे दोन्ही उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, दोन हजाराच्या वरच्या पातळीवर मक्याच्या मागणीत घट दिसत होती.”

“रब्बीतील वाढता पिक पेरा हे आता मक्यात नरमाई येण्यासाठी प्रमुख कारण ठरत आहे. देशातील एकूण मक्याचा पेरा 17 लाख हेक्टरवर पोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक या प्रमुख मका उत्पादक राज्यांत रब्बीतील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ आहे. मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद या प्रमुख जिल्ह्यात मक्याखालील क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ आहे. शिवाय, यंदा उन्हाळी मक्याच्या क्षेत्रात देखिल लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा मक्याकडे कल दिसतोय.”

वाचा  कापसाच्या नरमाईमागील तत्कालिक व दीर्घकालीन कारणे

“देशातील एकूण मका उत्पादनात या वर्षी खरीप हंगामाचा वाटा 65 टक्के तर रब्बी हंगामाचा वाटा 35 टक्के असणार आहे. खरीपाचा माल अजूनही मोठ्याप्रमाणार शिल्लक असून, 15 मार्च पासून रब्बीतील नव्या मक्याची आवक सुरू होईल. खासगी संस्थांच्या अऩुमानानुसार खरीपातून 160 लाख टन मका उत्पादन मिळाले आहे, तर रब्बीतून 90 लाख टन उत्पादन मिळण्याचे अनुमान आहे. एकूण 250 लाख टनाचा पुरवठा 19-20 ऑक्टोबर ते सप्टेंबर या मार्केटिंग वर्षांत अऩुमानित आहे. देशांतर्गत गरजेच्या तुलनेत यंदा मक्याचा पुरवठा संतुलित आहे. गेल्या वर्षीसारखा तुटवडा नाही. यामुळेच मक्याच्या बाजारभावात नरमाईचा कल दिसत आहे.”

“मक्याचे बाजारभाव उंच होते तेव्हा, अॅग्रोवन इ ग्रामच्या मार्केट ट्रेंड आणि मार्केट कट्टा या व्हिडिओ सिरीजमध्ये शेतकऱ्यांना विक्रीचा सल्ला देण्यात आला होता.”

Download App