वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून कर्मचारी यांना मास्क वाटप

Smiley face < 1 min

ई ग्राम : सध्या कोरोनाने जगभर हाहाकार घातला आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेटस वरिष्ठ अधिकारी त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचारी याची दखल घेत आहेत. भिगवण येथे मदनवाडी चौकात पुणे – सोलापूर महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.

वाचा  शेलपिंपळगाव ग्रामपंचायत देणार घरपोच अत्यावश्यक सेवा, भाजीपाला

यावेळी मुटेकर म्हणाले की, सध्या राज्यातील परिस्थिती चिंताजणक आहे. कोरोनाचा प्रभाव वाढ आहे .आजून इंदापूर तालुक्यात शिरकाव झाला नाही.
त्याला रोखण्यासाठी तालुक्यातील सर्व पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आणि लवकरच हे आलेले संकट जाण्यासाठी सर्वांनी घरात बसने गरजेचे आहे. कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी आता विनाकारण घरातून बाहेर पडणे बंद केले पाहिजे. यावेळी सहायक फौजदार बबन जाधव, पोलीस कर्मचारी भगवान दुधे, संतोष कांबळे, अमित बनकर, नाथा गळवे हे पोलीस कर्मचारी या ठिकाणी नाकाबंदीसाठी उपस्थित होते. त्याच्या सुरक्षेसाठी त्यांना मास्क देण्यात आले.

वाचा  कांदा लागवडीकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल
Download App