आमदार लंके यांच्या कृत्याचं होतंय कौतुक; वाचा सविस्तर…

Smiley face < 1 min

मुंबई : मुंबई हे असं शहर आहे, जेथे कोणीच उपाशी राहू शकत नाही. मुंबईत राज्यभरातून लोक कामधंदा शोधण्यासाठी येतात. राज्यातील अनेक लोक नोकरीच्या शोधात, तर कोणी आजारी नातेवाईकांना घेऊन मुंबईत येत असतात. अशा येणाऱ्या प्रत्येकाला हॉटेलमध्ये रुम घेऊन राहणं खिशाला परवडणार नसतं. मग अशा वेळी परवडणारा साधा सोपा उपाय म्हणजे आमदार निवासात राहणे. आमदार निवास हे राज्यतून येणाऱ्या अनेकांसाठी निवारा ठरत असत. जवळजवळ प्रत्येक आमदारांच्या खोल्या कायम कार्यकर्त्यांनी  भरलेल्या असतात. 

वाचा  सावधान, महाराष्ट्राची अशी आहे कोरोनाबाबतची परिस्थिती

सध्या सोशल मीडियावर अशाच एका आमदार निवासातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात स्वतः आमदार हे जमिनीवर सतरंजीवर झोपलेले पाहायला मिळतायत, तर कार्यकर्ते मात्र पलंगावर झोपलेले पाहायला मिळतायत. पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानातील हा फोटो आहे. 

पारनेरचे आमदार लंके यांना आकाशवाणी आमदार निवासात १०९  क्रमांकाची खोली मिळाली आहे. सदर दिवशी आमदार लंके हे आपलं काम संपवून रात्री १२ वाजता निवासस्थानी आलेत. ते आल्यावर त्यांच्या बेडवर काही कार्यकर्ते थकून झोपल्याचं लंके यांनी पाहीले. रात्रीचे १२ वाजले असल्याने आणि कार्यकर्ते थकून झोपल्याने आमदार लंके यांनी कुणालाही उठवलं नाही. स्वतः आपल्या बेडजवळ सतरंजी पसरवून लंके झोपलेत. कार्यकर्ते थकून भागून येतात, त्यांना रात्री कशाला उठवायचं असं लंके यांनी सांगितले. 

वाचा  काँग्रेसमध्ये राहून माझ्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही - सिंधिया

सकाळी जेंव्हा कार्यकर्ते उठले. तेंव्हा सर्वांनाच लंके यांच्या कृत्याचं आश्यर्य वाटलं. सर्वच कार्यकर्त्यांकडून लंके यांचं कौतुकही करण्यात आलं. सधा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सोशल मिडीयावरही आमदार लंके यांचं प्रचंड कौतुक केलं जातंय. 

Download App