कांदा निर्यात बंदी : मोदी देशाला गरीब करत आहेत काय ?

Smiley face < 1 min

ई ग्राम : जगभरामध्ये कांद्याचे बाजारभाव कडाडले असताना आपल्या देशामध्ये मात्र कांद्याचे भाव पुन्हा एकदा कोसळले आहेत जगभरातील कांद्याच्या किमती भारतातील किमती पेक्ष्या नेहमीच जादा असतात परंतु याचा फायदा केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना घेऊ देत नाही असा आवाज सामाजिक माध्यमातून येत असून शेतकरी युवक मोदी सरकारच्या निर्णयावर रोष व्यक्त करताना दिसून येत आहे. आज पाकिस्तानसह कोणीही कांदा निर्यात करत नाहीये अशा परिस्थितीत भारताला 3000 कोटी पेक्ष्या जास्त परकीय चलन मिळवून देणारा कांदा निर्यात बंद करून देशाला मोदीची गरीब करत आहेत असा सवाल व्यक्त करत आहेत. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असून ग्रामीण भागामधील युवक आणि शेतकऱ्यांची क्रयशक्ती (कारखान्यामधील उत्पादित घट्कांची खरेदी करण्याची क्षमता ) कमी होत आहे असा निर्भीड हल्ला केंद्र सरकार वर करत आहेत.

वाचा  कांदा निर्यातबंदी उठवण्याची घोषणा अन कांदा दरात सुधारणा

चीन मधील करोना व्हायरस मुळे चीन च्या निर्याती मध्ये प्रचंड घट झाली असून या मध्ये चिनी कांद्याची मागणी सुद्धा रोडावली आहे. जगभर कांदा तुटवडा असून जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या चीन आणि भारत या दोन्ही देशातून निर्यात होत नाही. याशिवाय पाकिस्तानमधून सुद्धा कांदा जागतिक बाजारपेठेत येत नाही अश्या वेळेस मागेल त्या भावाने कांदा निर्यात होऊ शकतो.

वाचा  एक छोटा प्रयत्न भारत आणि इंडियाला जोडण्यासाठी : विलास शिंदे

मध्यंतरी बांगलादेश चे शिष्टमंडळ कांद्याची मागणी करून गेले आहे. या शिवाय आखाती देशातून नाशिकच्या कांद्याला खूप मोठी मागणी असताना केंद्रातील मोदी सरकार निर्यात बंदी उठवत नसल्याने शेतकरी पुत्र सरकार वर रोष व्यक्त करत आहेत याच बरोबर नाशिक जिल्यातील सत्ताधारी असलेले भाजपा खासदार, राज्यातील केंद्रीय मंत्री , हे फक्त पत्र व्यवहार करण्या पलीकडे काहीच काम करत नाहीत असा त्रागा शेतकरी व्यक्त करत आहेत

वाचा  मठाचे भाव कोसळण्याचे चिन्ह
Download App