कांदा बाजार आढावा : सोलापुरात सर्वाधिक २५०० रुपये

Smiley face < 1 min

ई ग्राम, सोलापूर (प्रतिनिधी) ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. पण दर काहीसे स्थिर राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याचे दर काहीसे स्थिरच आहेत. चांगली आवक आणि मागणीमध्येही सातत्य असतानाही कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. या सप्ताहातही पुन्हा काहीशी अशीच स्थिती राहिली. कांद्याची आवक मुख्यत्वे जिल्ह्यातून आणि नजीकच्या पुणे, नगर, सांगली, उस्मानाबाद भागातून झाली. या सप्ताहात कांद्याची रोज ८० ते १०० गाड्या आवक राहिली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला.

वाचा  मार्केट ट्रेंड - हळद

या आधीच्या सप्ताहातही आवक १०० ते २०० गाड्या प्रतिदिन अशी होती. पण दरही जैसे थेच होते. किमान २०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपयांपर्यंत होता. त्याआधीच्या सप्ताहातही कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि किमान २०० रुपये असाच दर मिळाला. १०० ते २०० रुपयांचा चढ-उतारचा फरक वगळता कांद्याचे दर काहीसे टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

वाचा  लासलगाव मध्ये कांद्याच्या आवकेत सुधारणा, बाजारभाव १७३० वर
Download App