…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडणार, स्वाभिमानी संघटनेचा इशारा

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना विषाणू (व्हायरस) च्या अफवांमुळे चिकन ची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कुक्कटपालन व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. परिणामी राज्य सरकारने कुक्कटपालन व्यावसायिकांना मदत दयावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे बाजारात चिकनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कुक्कटपालन व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. करार केलेल्या कंपन्या पोल्ट्री फार्म वरुन पक्षी उचलण्यास तयार नाहीत. दर कमी होऊनही ग्राहक चिकन खरेदीसाठी धजत नाहीत. त्यामुळे कुक्कटपालन व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोंबडी व्यावसायिकांना मदत जाहीर करावी अशी मागणी देखील तुपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वाचा  फळे, पालेभाज्या विक्रेत्यांकडून नागरिकांची लूट

राज्य सरकारने जर लवकरात लवकर मदत जाहीर केली नाही तर आंदोलनाचा इशारा देत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडण्यात येतील असा इशारा दिला आहे.

वाचा  चिकन ८० रुपयांना किलोभर; रस्त्यावरच उभारली दुकाने
Download App