भिगवनला अवकाळी पावसाचा फटका

Smiley face < 1 min

ई ग्राम : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रविवारी (दि.१) रोजी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने रब्बीच्या गहू, ज्वारी आणि मका या पिकांचे नुकसान झाले. गेली दोन दिवसात हवामानात बदल पण होत होते. तसेच उन्हाचा तापा पण चांगलाच वाढलेला होता.

रविवारी भिगवणचा आठवडे बाजार असल्याने भिगवण आठवडे बाजारासाठी बाजूच्या २० किलोमीटर पासून लोक येतात. यात सुमारे २५ गावातील लोक येतात. या अचानक पणे आलेल्या पावसाने भिगवण व्यापारी पेठेत पण ग्राहक वर्ग शांत होता. परीणामी भिगवण परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

वाचा  पोल्ट्री नियंत्रक मंडळाची स्थापना होणार - पशुसंवर्धन मंत्री

भिगवणचा रविवारी आठवडे बाजार मोठा भरत असल्यामुळे या बाजारात शेजारील गावातून शेतकरी धान्य विक्रीसाठी आणतात. आजच्या आठवडे बाजारातही शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, मका या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झालेली होती. शेतकऱ्यांचा आणलेला माल आडत व्यापाऱ्यांनी खरेदी केला. परंतु सायंकाळी व्यापाऱ्यांनी माल उचलण्या आधी पावसाने हजेरी लावली. परिणामी यात आडत व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

वाचा  शेतकरी मदत केंद्रामध्ये तक्रारींचा पाठपुरावा करु

अचानक पणे पाऊस आल्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ही खंडित करण्यात आला होता. तसेच सुमारे एक तासभर पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचले आहे. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Download App