राज्यात आज रात्री ९ वाजता वीजपुरवठा खंडित होणार नाही

Smiley face < 1 min

ई ग्राम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रविवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरी काळोख करून त्या अंधारात मेणबत्त्या, दिवे पेटवून व मोबाईल टॉर्चने परिसर प्रकाशमय करण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळी राज्यातील वीजपुरवठा खंडित केला जाणार नसून पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन लोकांनी स्वयंस्फूर्तीने करावे, असे वीज खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंते रघुवीर केणी यांनी कळविले आहे.

वाचा  कामगारांना बळ देण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे रात्रभर जागरण

राज्यातील पथदीप लोकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू ठेवण्यात येणार असून इस्पितळे, पाणीपुरवठा विभाग, नियंत्रण कक्ष व इतर अत्यावश्यक आस्थापनांतही वीज पुरवठा कायम राहणार आहे.

भारतीय वीज ग्रीड प्राधिकरण व सर्व राज्यांतील वीज ग्रीड प्राधिकरणे संयुक्‍तरित्या या वीज पुरवठ्याचे काम हाताळीत आहेत, असे मुख्य वीज अभियंते केणी यांनी कळविले आहे.

यावेळी लोकांनी घरातील विजेचे दिवे स्वयंस्फूर्तीने बंद करून ठेवावेत. तर घरातील इतर विद्युत उपकरणे बंद करून ठेवण्याची गरज नाही, असेही केणी यांनी म्हटले आहे.

वाचा  विदर्भात उद्या वादळी पावसाची शक्यता
Download App