पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज

Smiley face < 1 min

पुणे : अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या बाष्प युक्त वाऱ्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होऊन पूर्व विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

पश्‍चिम चक्रावाताच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्याबरोबरच बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मात्र कमाल तापमानाचा पारा ३४ अंशापार आहे. आज गुरुवारी (दि.३) रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात निच्चांकी ११.१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वाचा  महाविकास आघाडीच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

दरम्यान मध्यप्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडू दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होऊन विदर्भात वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. आज विदर्भातील, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

आज गुरूवारी (दि. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.३, नगर ३३.३, धुळे ३२.२, जळगाव ३२.०, कोल्हापूर ३२.०, महाबळेश्‍वर २६.२, मालेगाव ३१.८, नाशिक २९.३, निफाड २८.०, सांगली ३३.७, सातारा ३२.३, सोलापूर ३४.३, अलिबाग २८.७, डहाणू २९.३, सांताक्रूझ २९.६, रत्नागिरी ३१.५, औरंगाबाद ३१.४, परभणी ३३.०, नांदेड ३५.०, अकोला ३४.४, अमरावती ३४.६, बुलडाणा ३०.६, चंद्रपूर ३६.५, गोंदिया ३२.१, नागपूर ३५.०, वर्धा ३५.७.

वाचा  शेतकरी उपाशी; विक्रेते तुपाशी
Download App