सिंदियांचा काँग्रेसला बाय बाय !!

Smiley face < 1 min

ई ग्राम : मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा कळवला आहे. आपल्या ट्विटर अकौंट त्यांनी ते पत्र जाहीर केले आहे.

मागच्या काही दिवसापासून मध्यप्रदेशात सत्ता संघर्ष चालू होता. मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातील वाद चांगला गाजला होता. मागील दोन दिवसापासून काँग्रेसचे सोळा आमदार देखील गायब असल्याची चर्चा होती. काल सिंधिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे सिंधिया भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

वाचा  अखेर बँकांचा संप मागे

सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केल्यास त्यांना भाजपाकडून राज्यसभा मिळणार कि मुख्यमंत्री बनवले जाणार असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

Download App