लॉकडाऊनसंदर्भात ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी कसे निर्णय घेतात याबाबच्या काही नोंदी

Smiley face < 1 min

ई ग्राम : देशात सद्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून शेत मालसंदर्भात ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी कसे निर्णय घेतात याबाबच्या काही नोंदी !

  1. एका शेतीबहूल तालुक्यात बाहेरचे वाहन येणार नाही आणि तालुक्यातील वाहन बाहेर जाणार नाही, संपूर्ण तालुका लॉकडाऊन करायचा असा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रसारित केला. काही तासानंतर प्रातांधिकाऱ्यांनी अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना तालुका बंद ठेवता येणार नाही, असे जाहीर केले. कारण, अंडी, दूध, कोंबड्या, भाजीपाला आदी माल बाहेर पाठवता येणार नाही. त्याची कोंडी होईल, हे त्यामागील प्रमुख कारण होते.
  2. एक बड्या ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील कांदा मार्केट बंद करावे, असे आदेश बाजार समितीला दिले आहेत. तथापि, फिजिकल डिस्टंसींग आदी नियम पाळून बाजार सुरळीत ठेवून पुरवठा साखळी सुरू राहणे गरजेचे आहे, असे सरकार सांगतेय.
  3. पुण्या-मुंबईत महापालिका आयुक्तांनी संसर्ग रोखण्याविषयक नियम-अटी पाळून शेतकरी कंपनीद्वारे आठवडे बाजार सुरू ठेवले आहेत. गावाकडे मात्र बहुतांश गावांनी आठवडे बाजार बंद केले आहेत.
    स्थलांतरीत मजूर, ड्रायव्हर, कारागीर अशा कष्टकरी लोकांना अपमानित करून हाकलले जात आहे, आणि त्याच वेळी शेतीकामांसाठी मजूर मिळत नाही, अशी विसंगत भूमिका विविध गावांमध्ये घेतली जातेय.
वाचा  महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका !

कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून काळजी जरूर घ्यायची आहे. पण, अत्यावश्यक सेवांची कोंडी करायचा अधिकार सरकारने कुठल्याही ग्रामपंचायतींना दिलेला नाही.

  • दीपक चव्हाण, ता. 5 एप्रिल.
Download App