इस्त्राईल पद्धतीने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

Smiley face 2 min

पालघर | भारतात पारंपरिक शेतीला बगल देऊन शेतीत नवीन प्रयोग खुप कमी प्रमाणात होतात. असे प्रयोग जरी झाले तरी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. याचा परिणाम म्हणून शेतकरी असे नवीन प्रयोग करण्यास धजावत नाही. मात्र पालघर येथील एका शेतकऱ्याने इस्रायली तंत्रज्ञानाने पाच एकर जमिनीत नवा प्रयोग करून पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड केली आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याने अनेक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे, येथे पिकवल्या जाणाऱ्या ‘वाडा कोलम’ तांदळाला देशातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मात्र अलिकडे भातशेतीचे बाजारभाव घसरल्याने येथील शेतकऱ्याची आर्थिक स्थितीही कोलमडली आहे. त्यामुळे येथील शेतकरी अन्य लावगडीकडे वळत आहेत. वाडा तालुक्यातील देवघर गावातील प्रफुल्ल पाटील हा तरुण शेतकरी यातीलच एक आहे.

वाचा  इस्त्राईल तंत्रज्ञान वापरुन दोन एकरात ३६ लाखांचे उत्पन्न!

याने आपल्या पाच एकर शेतीत पिवळ्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. यासाठी त्याने इस्त्राईल पद्धतीने या कलिंगडाची लागवड करण्याची किमया साधली आहे. तत्पूर्वी प्रफुल्ल पाटील यांनी अनेक ठिकाणी जाऊन या लागवडी संदर्भात माहिती घेतली. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील वर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवले होते. त्या गटातही प्रफुल्ल पाटील गेले होते. तेथील शेतीचे तंत्रज्ञान पाहून पाटील अत्यंत प्रभावित झाले. त्याचवेळी त्यांनी असा प्रयोग आपल्याही देशात करण्याचा निश्चय केला. पाटील यांनी मायदेशी परतल्यानंतर सोसायटीकडून कर्ज घेतले, कुटुंबीयांचे दागदागिनेही गहान ठेवले. आणि संपूर्ण पाच एकरला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली.

वाचा  गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका शक्य

देवघर येथील प्रफुल्ल यांनी आपल्या पाच एकर जमिनीत पिवळ्या कलिंगडलागवडीचा प्रयोग केला आहे. लागवड केलेल्या या कलिंगडांत दोन प्रकार आहेत. एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल आहे, तर दुसरे हिरवी साल आणि पिवळा गर आहे. ही कलिंगड बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करतील, अशी त्याला आशा आहे. कलिंगडाचे पीक घेताना बदामी व चौकोनी आकाराची कलिंगड साच्याच्या सहाय्याने तयार करण्याचाही त्यांचा मानस आहे. अशाप्रकारच्या विविध आकारातील कलिंगडांना बाजारमूल्य चांगले मिळेल. हे कलिंगड बाजारात नवीन असल्याने त्याला चांगली मागणी आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरातील अनेक मॉलमध्ये ती विक्रीसाठी जाणार आहेत.

वाचा  'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ५७० कोटी रुपये कर्जमाफी

प्रेरणादायी प्रयोग
पारंपरिक पद्धतीने भातशेतीची लागवड करून दरवर्षी कर्जात बुडणाऱ्या कुटुंबीयांना प्रयोगशील शेतीची नवी दिशा देण्याचं काम प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे. या प्रकारच्या शेतीसाठी कमी साधने आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी प्रफुल्ल हे ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पाहणी करून नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. इस्राईलला पाहिलेलं तंत्रज्ञान आणि कमी पाणी व कमी मनुष्यबळावर होणारी शेती पाहून आणि शांतिदूत फार्मिंगच्या तज्ज्ञाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपण किफायतशीर शेतीकडे वळल्याचे प्रफुल्ल सांगतो. त्यांनी शेतीत केलेला हा प्रयोग पालघरमधील भातउत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरेल अशी त्याला आशा आहे.

Download App