ठाकरे सरकारकडून मेगाभरतीची घोषणा?

Smiley face < 1 min

पुणे : राज्यात ७० हजार पदांची भरती होणार असल्याचे महाविकास आघाडीने सरकाने सांगितले. राज्यात आता जिल्हा परिषद व इतर शासकिय खात्यामध्ये मिळून एकूण दोन लाख १९३ पदे रिक्त आहेत. ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मिळवली आहे.

यादव यांनी शासनाकडे सर्व विभागांमध्ये मिळून ३१ डिसेंबर २०१९  अखेर मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची संख्या मागवली होती. १७ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन दाखल केला होता. त्याबाबतची माहिती प्रशासन विभागाने आज (९ मार्च) नितीन यादव यांना दिली. यामध्ये १ जानेवारी २०२० पासून भरलेल्या पदांच्या संख्येचा समावेश नाही. पण एकूणच शासनाच्या प्रत्येक कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत हे स्पष्ट झाले आहे.

वाचा  शेतीच्या सगळ्या योजनांचा लाभ आता एकाच अर्जावर

नितीन यादव यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर असलेल्या शासकीय पदांपैकी एक लाख ४१ हजार ३२९ पदे ही सरळसेवा भरतीतील पदे आहेत, जी रिक्त आहेत. तर पदोन्नतीतून भरली जाणाऱ्या पदांची संख्या तब्बल ५८ हजार ८६४ एवढी आहे. सध्या सरळसेवा भरतीतूनच शासनाला दीड लाख पदांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात ही पदे भरली जाणार का याची उत्सुकता आहे.

वाचा  शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिदंमला ठाकरे सरकारचा दणका

कोणत्या विभागात किती पदे आहेत रिक्त
गृह खात्यात २८ हजार, आरोग्य २० हजार ५९४, जलसंपदा २० हजार ८७३, कृषी विभागात १४ हजार, महसूल विभागात १२ हजार, तर शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागात ५ हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात ८ हजार ६२८ पदे रिक्त आहेत.

दरम्यान, एकिकडे सरकारकडून ७० हजार पदांची भरती होणार सांगितले आहे, परंतु दुसरीकडे मात्र दोन लाखांपेक्षा अधिक पदे राज्यात रिक्त आहे. त्यामुळे उर्वरीत पदे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाचा  सरकार जर शेतकऱ्यांच्या विरोधात गेले तर राजदंड उगारणार - पटोले
Download App