विपरीत विकासाचे दुष्परिणाम

Smiley face < 1 min

ई ग्राम : महात्मा गांधी सांगायचे की, देशाचा विकास करायचा असेल तर ह्या देशातील 7 लक्ष खेडी सर्वप्रथम समृद्ध झाली पाहिजे. सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचे उद्योग केले नसते व खेडी समृद्ध होऊ दिली असती तर खेड्यामध्ये छोटे छोटे लघुउद्योग उभे राहिले असते व खेड्यातच रोजगार उपलब्ध झाला असता व खेड्यामधुन स्थलांतर होऊन शहरही सुजली नसती. कोरोना मुळे आज जी शहरातुन खेड्यात जाण्यासाठी निर्माण झालेली स्थलांतराची समस्या ही निर्माण झाली नसती.

वाचा  #अर्थसंकल्प - २० लाख शेतकऱ्यांना सौरपंप

स्वातंत्र्यानन्तर औद्योगिकीकरण वाढविण्यासाठी कारखान्याना लागणारा कच्चा माल (शेतीमाल) स्वस्त मिळावा व कमी पगारावर काम करणारा कामगार मिळावा म्हणून शेतीमालाचे भाव पाडुन शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांची अमानुषपणे लुट केली व खेडी उद्धवस्त केली व शहरे वाढली. शहरांची झालेली वाढ ही शहरांचा विकास नसुन ती शहरांना आलेली सूज आहे. देशातील सर्व शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये शेतकऱ्यांची निर्वासित पोरे आपले गाव सोडुन शहराच्या आश्रयाला आली होती व त्यांच्यावर आज पुन्हा आपल्या गावाकडे परत जाण्याची नामुष्की आली आहे पण लॉक डाऊन मुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकुन पडली आहेत.

वाचा  कर्ज परतफेड करणाऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

स्वातंत्र्यानन्तर त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरुंनी आखलेले शेतकरी विरोधी धोरण जसेच्या तसे पुढे चालु ठेवण्यात सगळ्याच पक्षांच्या सरकारांनी धन्यता मानली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार बदलणे म्हणजे कासाईखाना बदलण्यासारखे आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शेतकरी विरोधी धोरण बदलण्याचा निर्णय घेतला तरच हा देश, ह्या देशातील अर्थव्यवस्था वाचु शकेल अन्यथा या देशात रोजगाराच्या शोधात इंडिया च्या आश्रयाला निघालेली पोर जर बेरोजगार राहिली तर देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही सुखवस्तू लोकांना वाटत असेल की आपल छान चालल आहे तर तो त्यांचा भ्रमनिरास ठरेल.

वाचा  पीएम मोदी यांच्या आवाहानानंतर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला भारत

ऍड प्रकाशसिंह पाटील ,हायकोर्ट औरंगाबाद
मोबाईल नंबर ९४२३७८७९12 व ,९८२२३६८९५४

Download App