राज्यातील मृतांची संख्या १४९ वर

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात गेल्या चोवीस तासात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता १४९ झाली आहे. तसेच २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. तसेच राज्यभरात २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

वाचा  पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे- अमोल मुजुमदार

४१हजार१०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत.

वाचा  आता पशुपालकांनाही मिळणार किसान क्रेडिट कार्डाचा लाभ

यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलडाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण नगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.

वाचा  लॉकडाऊनमुळे यांच्यावर उपासमारीची वेळ
Download App