जालना जिल्ह्यात साडेआठशे हेक्‍टरला अवकाळीचा फटका

Smiley face < 1 min

ई ग्राम, जालना (प्रतिनिधी) : अवकाळी पावसासह गारपिटीने औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील जवळपास ४८९१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या क्षेत्रातील गहू, ज्वारी, हरभरा, मका, मोसंबी, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले होते. परंतू पंचनाम्याचे आदेश नसल्यामुळे नुकसानीचे नेमके प्रमाण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पंचनाम्याच्या आदेशाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासह परभणी जिल्ह्यात काही प्रमाणात अवकाळी पाउस तर काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान झाल्यानंतर काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी आहेत. पंचनाम्यासंदर्भात महसूल विभागाकडून अजून आदेशच नसल्याने पंचनाम्याची प्रक्रिया कुठेही सुरू नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. अर्थात पंचनाम्याशिवाय झालेले नुकसान भरपाईस पात्र की अपात्र हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

वाचा  टंचाई निवारण्यासाठी कृती आराखड्यावर मदार
https://twitter.com/Agrowonegram/status/1235196956533612544

८५६ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी या दोन तालुक्‍यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने ८५६ हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाले. त्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या ५०४ हेक्‍टरसह गारपिटीमुळे बाधित झालेल्या ३५२ हेक्‍टरवरील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह मोसंबी या फळपिकांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २२७ हेक्टरला फटका
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, औरंगाबाद, कन्नड व पैठण तालुक्‍यात अवकाळी पावसासह आलेल्या वादळामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका आदी पिकांसह द्राक्ष व मोसंबी या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास २२७ हेक्‍टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाचा  देवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर सर्वात खुश मुनगंटीवार होतील : अजित पवार

बीडमध्ये २२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बीड जिल्ह्यातील आष्टी, वडवणी या दोन तालुक्‍यांत जवळपास २२०० हेक्‍टरवरील रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, मका, हरभरा, कांदा या पिकांसह संत्रा पिकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Download App