विदर्भात उद्या वादळी पावसाची शक्यता

Smiley face < 1 min

ई ग्राम, पुणे (प्रतिनिधी) : पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ, मराठवाड्यात उद्या (ता. 29) पावसाचा अंदाज आहे. पुर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम झाल्याने बुलडाणा, अमरावतीमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस, तर वर्धा, नागपुर, चंद्रपूर जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच असल्याने दिवस रात्रीच्या तापमानात तफावत वाढली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. तर कोकण आणि विदर्भात मात्र तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. गुरूवारी (ता.27) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सलग दुसऱ्या दिवशी नीचांकी 7.5 अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 38.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वाचा  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अंदोलन

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने दोन दिवसांपासुन राज्याच्या किमान तापमानात अचानक घट होत गारठा थोडासा वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी 35 अंशाच्या वर गेलेला कमाल तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. कोकणात मात्र उन्हाचा ताप कायम असून, रत्नागिरीसह, सांताक्रुझ, अलिबाग, तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली. सोलापुरमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे होते.

वाचा  शेतकरीकेंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोल: डॉ.अजित नवले

गुरूवारी (ता. 27) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 30.8 (12.1), नगर 33.5 (12.1), धुळे 32.0 (10.4), जळगाव 32.6 (13.0), कोल्हापूर 32.8 (19.6), महाबळेश्‍वर 27.9 (15.1), मालेगाव 31.8 (13.0), नाशिक 30.2 (12.0), निफाड 28.5 (7.5), सांगली 35.0 (18.4), सातारा 32.5 (14.5), सोलापूर 35.1 (19.7), अलिबाग 35.9(19.4), डहाणू 34.4 (19.0), सांताक्रूझ 36.4 (20.4), रत्नागिरी 38.0 (19.7), औरंगाबाद 31.0 (13.5), परभणी 32.8 (12.8), नांदेड 33.0 (16.0), अकोला 33.4 (14.2), अमरावती 31.8 (13.0), बुलडाणा 30.0 (16.0), चंद्रपूर 32.5 (14.0), गोंदिया 28.5 (14.6), नागपूर 31.6 (12.5), वर्धा 32.0 (15.4), यवतमाळ 30.5 (17.4).

वाचा  शेतकऱ्यांना सन्मान हवा !
Download App