रोगापेक्षा उपचारच जीवावर बेतला; कोरोनाच्या खोट्या अफवांचा परिणाम

Smiley face < 1 min

ई ग्राम : साधारण दोन महिन्यांपूर्वी चीन येथील वुहान शहरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण सापडले. हा हा म्हणता या संसर्गजन्य रोगाने अवघे जग व्यापल्याने खळबळ उडाली आहे. शंभरहून अधिक देशांत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत ५ हजारहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी अनेक अफवा उठत आहेत. कोरोनोच्या लागणने नाही तर चक्क अफवांनी इरानमधील २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा  पीएम मोदी यांच्या आवाहानानंतर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला भारत

इरानमध्ये वाऱ्यासारखी कोरोनाची लागण पसरत आहे. आतापर्यंत पाच हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे. ही लागण थांबवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शाळा, कॉलेज, सांस्कृतिक आणि खेळ यासारखे सर्व मोठे उत्सव थांबवण्यात आलं आहे.

चीनमधून पसरलेल्या या खतरनाक वायरसने जगभरात आतापर्यंत एक लाखहून अधिक लोकांना लागण झाली आहे. आतापर्यंत ३ हजारहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या व्हायरसने घाबरून ईरानमध्ये अल्कोहोल पिऊन बचाव करण्यासाठी गेलेल्या २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. इरानची न्यूज एजन्सी IRNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हायरसच्या संक्रमणपासून वाचण्यासाठी अनेक उपाय समोर येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवत काही लोकांनी मिथेनॉल प्यायलाची घटना समोर आली. यामध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा  कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण…

जुंदिशापुर मेडिकल युनिर्व्हसिटीच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार २१८ लोकांना रूग्णालयात दाखल केलं आहे. अधिक प्रमाणात मिथेनॉल प्यायल्यामुळे डोळ्यातील दृष्टी, किडनी खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

Download App